थोडक्यात संघटनेची वैशिष्ठे
थोडक्यात संघटनेची वैशिष्ठे
ऑल इंडिया जनसेवा संघटना भारत ही पोलीस व नागरिक यातील दुवा असून अनाथ मुले, अपंग व्यक्ती , अंध व्यक्ती , मुकबधीर , जेष्ठ नागरिकांपासून ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कार्य करत असून पोलिसांच्या मागणीनुसार बंदोबस्तासाठी सहकार्य , सर्व थोर महापुरुष जयंती व इतर धार्मीक सण व महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध संघटना कार्य करीत आहे. जास्तीत जास्त महिला सक्षमीकरण करण्यासाठी संघटनेचे विशेष कार्य आहे. ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून एक स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून कार्यरत आहे.
संघटनेचे उद्देश
शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार देऊन सक्षम बनविण्याचा उद्देश.
शेतकऱ्यांच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करणे.
संघटनेच्या माध्यमातून पोलीस व नागरिकांच्या आरोग्यासाठीची शिबीर योजना.
महाराष्ट्रातील अनाथ आश्रम , वृद्धाश्रम ,शेतकरी आत्महत्या गृहस्थ कुटुंबातील मुला-मुलींसाठी संस्थेच्या मदतीने सहकार्य.
- संस्थेचे कार्य आणि नियमावली -
१) ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत ही संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.
२) पोलीस व नागरिकांच्या सेवेसाठी सदैव कामे करणे तसेच पोलीसांच्या पुर्व परवानगीने पोलीसांसोबत बंदोबस्तासाठी सहकार्य करणे.
३) ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचा कार्यकर्ता म्हणून अपघात किंवा इतर घटना घडल्यास पोलीसांच्या सहकार्याने नागरिकांना मदत करणे.
४) समाजातील कोणत्याही जाती १८ वर्षे पुर्ण असलेले पुरूष आणि / स्त्री ऑल इंडिया पोलीस धर्मातील जनसेवा संघटनेचे सभासदत्त्व घेण्यास पात्र असतील.
५) अंध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना सहकार्य करणे तसेच शासनाकडून आलेल्या जनहितार्थ व आरोग्यविषयक जनजागृतीमध्ये सहभागी होणे. जय हिंद
६) पोलीस कुटूंबियांकरिता व ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या सभासदांकरीता तसेच नागरिकांकरीता आरोग्य शिबिरे आयोजित करणे.
७) शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याबाबत मार्गदर्शनपर शिबिर भरविणे. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शालेय शिक्षणाकरीता, उच्च शिक्षणाकरीता व औद्योगिक प्रशिक्षणाकरीता शिबिरे भरविणे.
८) पदाधिकारी व सदस्य यांनी ओळखपत्राचा गैरवापर केल्यास ते किंवा त्या स्वत: जबाबदार असतील व ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
९) ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी कोणत्याही प्रकारचे कार्यालयीन साहित्य, लेटरहेडचा, संघटनेच्या शिक्क्याचा गैरवापर करू नये. तसे आढळल्यास ऑल इंडिया पोलीस जूसेवा संघटनेतर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
१०) ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेची महाराष्ट्राबाहेर शाखा सुरू करायची असल्यास महाराष्ट्रातील ज्याच्या मार्फत शाखा सुरू करायची आहे त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी.
११) संघटनेच्या एखाद्या पदाधिकाऱ्याने संघटनेच्या पदाचा काही कारणास्तव राजीनामा दिल्यास संघटनेच्या संदर्भातील सर्व माहिती उदा. सभासद नाव व फोन नं., स्टेशनरी, लेटरहेड, ओळखपत्र इ. सर्व संस्थेकडे जमा करावीत.