घरच्या आर्थिक परिस्थिती तसेच घरची इतर जबाबदारी मुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही. लहान वयापासूनच जबाबदारी काही कारणास्तव अंगावर आली. वडील मुंबईला असल्यामुळे पुन्हा मुंबईला जाण्याचा योग आला .तिथे गेल्यामुळे छोटी मोठी नोकरी करता करता शिवसेना पक्षात काम करण्याची संधी मिळाली , तिथूनच समाजसेवेची आवड निर्माण झाली.
१९८७ च्या मुंबई गोरेगाव पोलीस भरतीमध्ये प्रयत्न करूनही भरती होवू शकलो नाही , मनामध्ये कुठेतरी खाकी वर्दीच्या बाबतीत आदर व इच्छा खूप होती . २००३ मुलांच्या शिक्षणासाठी स्थाईक झालो असता ' पोलीस मित्र संघटना पुणे ' या संघटने मधे एक पदाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर आपली पण एक स्वतंत्र संघटना असावी अशी इच्छा निर्माण झाली आणि ती परमेश्वराच्या कृपेने साध्य झाली . एक स्वतःची 'ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना - भारत ' स्थापन केली. इतर पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या सहकार्यामुळे आज रोजी महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांतून तसेच इतर राज्य ( गुजरात , कर्नाटक व गोवा ) येथे कार्यरत आहे.
🙏🏻जय हिंद जय भारत 🙏🏻
जनार्दन तुकाराम गुरव
मी जनार्दन तुकाराम गुरव राहणार मुंबई दिवा मला समाज सेवेची खूप आवड आहे व ती मी कुठे ना कुठे करत असतो त्यातून मला 2018 ला पोलीस जनसेवा संघटना याची माहिती मिळाली व मी त्या संघटने मध्ये सदस्य पदावरती दाखल झालो नंतर मला माझे काम पाहून त्या संघटनेमध्ये दिवा शहर अध्यक्ष पद तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी घेण्यात आले कालांतराने ती संघटना काही कारणास्तव बंद करण्यात आली व मी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश जी डोंगळे साहेब यांच्या संपर्कात आलो त्यांनी मला सदस्य ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या पदाची धुरा सांभाळण्याची संधी दिली त्या बद्धल मी प्रथम त्यांचे आभार मानतो सध्या आमची संघटना खूप छान काम करत आहे 10 ते 12 जिल्हा मध्ये खूप चांगल्या प्रकारे संघटना कार्यरत आहे. 22 /8/2023 ला संघटनेला 3 वर्ष पूर्ण झाली .
संघटनेतील सदस्य पदाधिकारी सुख दुःखात एकत्र चांगले काम करत आहेत याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत अशीच छान कार्य करत राहूदे ही ईश्वर चरणी प्रार्थना
🙏🏻जय हिंद जय भारत 🙏🏻
गितांजली शेखर चौगुले
माझे नाव गीतांजली शेखर चौगुले
जन्मस्थळ पुणे
शिक्षण बी कॉम प्लस पॅरलेस पेशंट साठी मसाज व फिजोथेरपी ट्रीटमेंट गेली 18 ते 19 वर्ष
स्वतः अध्यात्मिक पद्धतीने ट्रीटमेंट देऊन पॅरॅलिसिस पेशंट कव्हर केले. त्यातून गावोगावी जाऊन व घरातली लोकांची परिस्थिती बघून समाजसेवा मनात बसली तसेच नऊ वर्षांपूर्वी मिस्टर अचानक अपघाती मृत्यू झाल्यानंतर दोन मुलांची जबाबदारी अंगावर पडली परिस्थिती कमजोर झाल्यामुळे नातेवाईक व समाज खूप जवळून अनुभवायला मिळाला. एकटी स्त्री समाजात पडली तर तिच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ही परिस्थिती अनुभवायला मिळाली .
सहकार्य करणारी चांगली खाकी वर्दी तसेच सहकार्य न करणारी खाकी वर्दी पण बघायला मिळाली लोकांचे येणारे वाईट अनुभव यातून मी मुलांसाठी स्वतःला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला आणि यातूनच छोटी मोठी भूमिका घेऊन समाजासाठी छोटे छोटे कार्य करत आले आज माझ्या मोठ्या मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन त्याचे लग्नही झाले घरात सून ही आली छोट्या मुलगा इयत्ता नववी शिकत आहे समाज सेवेचीआवड असल्यामुळे कोरोना नंतरच्या काळात ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश डोंगळे सर यांच्या माध्यमातून प्रथम मी सातारा जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून आले त्यानंतर माझे काम बघून पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी घेण्यात आले आज मी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी कार्यरत आहे
माझा जास्तीत जास्त लढा हा महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आहे. विधवा महिलांसाठी कार्य मी करत आहे.
कारण मी माझ्या आयुष्यात आज नऊ वर्ष झाले माझे मिस्टर जाऊन पण मी विधवा म्हणून कधीच आयुष्य काढले नाही ही भूमिका माझी सर्व विधवा महिलांसाठी आहे. समाजकार्य करण्यासाठी जी मला मॅनपावर पाहिजेल होती ती मला ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत, कडून मिळाली आज त्या माध्यमातून निराधार लोकांना आधार देणे, महिलांना सक्षम बनवणे, लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभे राहून त्यांना पाठिंबा देणे संघटनेत राजकारण न करता प्रामाणिकपणे समाजसेवा करणे हे माझे पर्सनल सूत्र.. आणि आता माझं ध्येयही
माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत ही समाजसेवा मी प्रामाणिकपणे करेल. माझ्या या कामासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मिळो
ही ईश्वरचरणी प्रार्थना
||एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ||या वाक्याप्रमाणे माझी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत ही फॅमिली अशीच एकत्रीत राहो
🙏🏻जय हिंद जय भारत 🙏🏻